नवी दिल्ली : पर्यटन वाढविण्यासाठी भारत सरकारनं एक मोबाईल अॅप लॉन्च केलंय. या अॅपद्वारे पर्यटकांना देशभरातील हॉटेल कुठे आणि त्याच्या किंमती, विमानाचं तिकीट आणि स्थानिक फिरण्याचे ठिकाणं यासंबंधीची सर्व माहिती असणार आहे.
पर्यटकांना एखाद्या ठिकाणांबदल माहिती हवी असेल तर १० ते १२ वेगवेगळ्या अॅपचा वापर करावा लागत असे. पण, या अॅपमध्ये पर्यटकांना सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे. या अॅपमुळे पर्यटकांना एखाद्या शहराची माहिती सहजरित्या मिळू शकते, असं पर्यटन सचिव परवेझ दीवान यांनी म्हटलंय.
'अतुल्य भारत' यांच्या भागिदारीमध्ये ट्रिपगेटर डॉट कॉमनं 'ट्रिपगेटर अँड्राइड अॅप' लॉन्च केला आहे. या अॅपमुळं पर्यटनांसंबंधी तर सर्व माहिती मिळेल. त्याचबरोबर आरोग्य सुविधा बदल देखील माहिती मिळणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.