हवाई दल हेलिकॉप्टर अपघातात 7 ठार

उत्तर प्रदेशात हवाई दलाच्या हेलिकॉप्टर शुक्रवार सायंकाळी  कोसळले. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

Updated: Jul 25, 2014, 09:20 PM IST
हवाई दल हेलिकॉप्टर अपघातात 7 ठार title=

सीतापूर : उत्तर प्रदेशात हवाई दलाच्या हेलिकॉप्टर शुक्रवार सायंकाळी  कोसळले. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

हवाई दलाचे ध्रुव हेलिकॉप्टर बरेलीवरून अलाहाबादला निघाले होते. उड्डाणादरम्यान हेलिकॉप्टरचा विद्युत तारांना स्पर्श झाल्याने पेट घेतला. यावेळी झालेल्या अपघातात हेलिकॉप्टरमधील सर्वांचा जळून मृत्यू झाला.

विमान घटनास्थळी बचाव दलाचे पथक आणि अधिकारी तात्काळ दाखले झालेत. मात्र, या अपघातात जळून सात जणांचा मृत्यू झाल्याने बचाव दल पथकाचा उपयोग झाला नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.