www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्ली
मुंबईत यूपी, बिहारचे नागरिक मोठ्या संख्येनं स्थलांतरित होतात हे तर आपल्याला माहितीच आहे. मात्र देशाच्या राजधानीवरही यूपी आणि बिहारच्याच नागरिकांचा कब्जा असल्याचं एका सर्वेक्षणातून स्पष्ट झालंय.
दिल्लीत स्थलांतरित होणारे सर्वाधिक म्हणजे ४७ टक्के लोक उत्तर प्रदेशातील असतात, तर ४३ टक्के हे बिहारचे. दिल्ली सरकारसाठी मनुष्यबळ विकास संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणातून ही आकडेवारी समोर आलीय. उत्तर प्रदेशातून दिल्लीत होणार्यास स्थलांतराचं २००१मध्ये ४३ टक्के प्रमाण होतं जे वाढून आता ४७ टक्के झालंय. तर बिहारमधून दिल्लीत स्थलांतरित होणार्यां चं प्रमाण १४ टक्क्यांवरुन ३१ टक्क्यांवर गेलंय.
गेल्या वर्षभरात बाहेरून दिल्लीत आलेले ४० टक्के तरुण शिक्षणासाठी आलेत. तर ५७ टक्के तरुणांनी रोजगारासाठी आल्याची कबुली दिली आहे. कमीत कमी पगारामध्ये दिल्लीतले पुरुष जिथं १८ हजार रुपयांवर काम करतात. तिथं हे स्थलांतरित पुरुष केवळ ६ हजार १७५ रुपयांत काम करतात. तर स्थलांतरित महिला या फक्त ४ हजार पगार घेऊनही काम करतात. कमी पगाराच्या होकारामुळंच दिल्लीत स्थलांतर वाढल्याचं बोललं जातंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.