भोपाळ : भारतात देहव्यापार करण्याला कायदेशीर मान्यता नसली तरी देशातील जवळपास सर्वच भागात हा व्यापार मोठ्या प्रमाणावर चालतो. मध्य प्रदेशातील एका जिल्ह्यात मात्र ६५ गावांमध्ये २५० ठिकाणी अगदी खुलेपणाने हा देहविक्रीचा व्यापार चालतो.
मध्य प्रदेशातील नीचम, रतलामस मन्दसौर जिल्ह्यातील गावे देहविक्रीची प्रमुख केंद्रे बनत जात असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी नुकतीच जैतपुऱ्यातील पाच महिलांना अटक केली आहे ज्या या रॅकेट चालवण्यातील मुख्य आरोपी आहेत.
माळवा या समाजातील एका प्रथेनुसार मुलगी जन्माला आल्यावर उत्सव साजरा केला जातो. या जिल्ह्यात वर पक्षाकडून वधू पक्षाला हुंडा दिला जातो. याच प्रथेमुळे या गावातील अनेक मुले अविवाहित राहिली आहेत.
या जिल्ह्यांत राहणाऱ्या माळवा समाजात देहविक्रीला सामाजिक मान्यता आहे. याच प्रथेमुळे समाजात एचआयव्हीचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यातील अनेक केसेसमध्ये तर गर्भवती महिलांकडून त्यांच्या मुलांना या रोगाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्याचमुळे या सर्व प्रकारांना आळा घालण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.