चेन्नईत आयटी विभागाकडून 10 कोटींच्या जुन्या नोटा जप्त

आयकर विभागाने चेन्नईमध्ये एका ज्वेलर्सच्या शोरुम तसेच घरावर टाकलेल्या छाप्यात तब्बल 10 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा तसेच काही किलो सोने आणि हिरे जप्त केलेत. 

Updated: Dec 20, 2016, 12:50 PM IST
चेन्नईत आयटी विभागाकडून 10 कोटींच्या जुन्या नोटा जप्त title=

चेन्नई : आयकर विभागाने चेन्नईमध्ये एका ज्वेलर्सच्या शोरुम तसेच घरावर टाकलेल्या छाप्यात तब्बल 10 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा तसेच काही किलो सोने आणि हिरे जप्त केलेत. 

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, 10 कोटी रुपयांच्या 500 आणि 1000रुपयांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्यात. तसेच रोख रकमेसह काही किलो सोने आणि हिऱ्यांचे दागिनेही जप्त करण्यात आलेत.

नोटाबंदीनंतर आयकर विभागाकडून विविध ठिकाणी छापे टाकण्यात येतायत. यात मोठ्या प्रमाणात रोख रकमा सापडल्यात.