खुशखबर : नव्या वर्षात नोकऱ्यांची संख्या आणि वेतन वाढणार

नवं वर्ष भारतीयांसाठी खुशखबर घेऊन आलंय. यंदाच्या वर्षात १० लाखांहून अधिक नोकऱ्या भारतात निर्माण होणार आहेत. तसंच १० - ३० टक्क्यांपर्यंत वेतनवाढ नोकरदार वर्गाला मिळू शकते, अशी शक्यता बाजारातून वर्तवण्यात येतेय. 

Updated: Jan 2, 2016, 09:54 AM IST
खुशखबर : नव्या वर्षात नोकऱ्यांची संख्या आणि वेतन वाढणार  title=

नवी दिल्ली : नवं वर्ष भारतीयांसाठी खुशखबर घेऊन आलंय. यंदाच्या वर्षात १० लाखांहून अधिक नोकऱ्या भारतात निर्माण होणार आहेत. तसंच १० - ३० टक्क्यांपर्यंत वेतनवाढ नोकरदार वर्गाला मिळू शकते, अशी शक्यता बाजारातून वर्तवण्यात येतेय. 

मानव संसाधन तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, २०१५ मध्ये अनुकूल आर्थिक वृद्धीमुळे तसंचरिटेल, अर्थ आणि तंत्रज्ञान या भागांत स्टार्टअप आल्यानं यांमध्ये तेजीचं वातावरण निर्माण झालंय. हे वातावरण २०१६ मध्ये कायम राहण्याची दाट शक्यता आहे.

'मायहायरिंग क्लब' या नियुक्ती पोर्टलच्या एका सर्व्हेनुसार, २०१६ मध्ये जास्तीत जास्त कंपन्या आपल्या कंपनीतील नियुक्त्यांबद्दल आशावादी आहेत. हा सर्व्हे १२ प्रमुख शहरांमधील १२ औद्योगिक क्षेत्रांतील ५४८० कंपन्यांवर आधारित आहे.

सरकारद्वारे डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडिया यांसारख्या कार्यक्रमांवर भर देण्यानं उत्पादन क्षेत्रात तंत्रज्ञान आणि मनुष्यबळाची मागणी वाढण्याची शक्यता आहे.