पठाणकोटमध्ये पुन्हा गोळीबार सुरु

पंजाबच्या पठाणकोट एअरफोर्स स्टेशनवर दहशतवादी हल्ला झालाय. या हल्ल्यात आता पर्यंत दोन दहशवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलंय.

Updated: Jan 2, 2016, 12:20 PM IST
पठाणकोटमध्ये पुन्हा गोळीबार सुरु title=

पंजाब : पंजाबमध्ये दहशतवादी हल्ला झालाय. सहा दहशतवाद्यांनी पठाणकोटच्या एअरफोर्सस्टेशवनर हल्ला केलाय. या हल्ल्यात दोन जवान शहीद झालेत तर चार जवान जखमी झालेत. या भागात अजूनही जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. आतापर्यंत दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात यश आलंय. 

11.45 - चकमकीत तिसरा जवान शहीद 

11.29 - ज्या पद्धतीने काश्मीरनंतर पाकिस्तानी पंजाबला लक्ष्य करत आहेत देशासाठी हे धोकादायक आहे - शिवसेना नेते संजय राऊत

11.15 - पठाणकोटमध्ये पुन्हा गोळीबार सुरु 

11.13 - घटनास्थळाहून ताब्यात घेण्यात आलेल्या कारमधून जैश-ए-मोहम्मद असे लिहिलेला कागद आढळला. 

11.03 - एनआयए पथक घटनास्थळी दाखल 

11.00 - एअरफोर्स स्टेशमनधून पुन्हा गोळीबाराचे आवाज - एएनआय

10.36 - भारताचे जवान दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देतायत  - गृहमंत्री राजनाथ सिंह

10.21 - पाकिस्तानसोबत शांतता कायम राखण्यासाठीचे प्रयत्न केले जात असतानाच हा हल्ला झाल्याची घटना दुख:द - अमरिंदर सिंग पंजाब काँग्रेसचे प्रमुख

10.10 - संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर पठाणकोठ हल्ल्याप्रकरणी आज सायंकाळी बैठक घेणार आहेत. 

10.09 - १ गरुड कमांडो आणि १ डिफेन्स सुरक्षा जवान या चकमकीत शहीद

10.04 - दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांकडून हल्ल्याचा निषेध.

9.21 - पाकिस्तानच्या बहावलपूर भागातून हे दहशतवादी आल्याचे सांगण्यात येत आहे. 

9.00 - पठाणकोटमधील धुमश्चक्री संपल्याची सूत्रांची माहिती 

8.20 - दिल्लीतील एअरफोर्स मुख्यालयात तातडीने बैठक बोलावली. 

8.19 - पठाणकोट राष्ट्रीय सुरक्षा पथक तसेच गरुड कमांडो फोर्स आणि दहशतवाद्यांमध्ये अद्याप चकमक सुरु 

8.12 - राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल घटनेकडे लक्ष ठेवून आहेत.

8.08 - दहशतवादी हल्ल्यानंतर पठाणकोट-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. 

8.05 - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाकिस्तान भेटीनंतर हा हल्ला झालाय. वर्षभरातील पंजाबमध्ये झालेला हा दुसरा मोठा हल्ला आहे. गेल्या वर्षी पंजाबच्या दियाना नगर येथील पोलीस ठाण्यावर तीन दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. तब्बल १२ तास दहशतवाद्यांशी चकमक सुरु होती. 

8.02 - दोन हेलिकॉप्टर घटनास्थळी दाखल

7.50 - पठाणकोटच्या पाकिस्तान बॉर्डरजवळ जमैलसिंग परिसरातून शुक्रवारी पीएपी ७५ बटालियनचे असिस्टंट कमांडेट यांचे अपहरण झाले होते. ५ अपहरणकर्ते लष्कराच्या वेशात होते. यात दहशतवाद्यांचा हात असल्याची शक्यता व्यक्त केली होती. 

7.50 - हे दहशतवादी जैश-ए-मोहम्मदचे असल्याची शक्यात वर्तवण्यात आलीये.

7.32- दोन दिवसांपूर्वीच दहशतवाद्यांनी घुसरखोरीचा प्रयत्न केला होता. 

7.30 -  सकाळी साडेतीनच्या सुमारास हे दहशतवादी लष्कराच्या वेशात घुसले आणि गोळीबार सुरु केला. 

7.28 - एअरफोर्स स्टेशनमधील हेलिकॉप्टरर्स तसेच इतर उपकरणे सुरक्षित असल्याची अधिकाऱ्यांची माहिती

7.25 - दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरु असल्याचा आवाज, एसएसपी आर.के.बक्षींची माहिती. दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश

7.22 - ४ ते ५ दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची शक्यता

7.20 - पंजाबमधील पठाणकोट एअर फोर्स स्टेशनवर दहशतवाद्यांचा हल्ला झाल्यची माहिती