मुंबई : 'गुंज इंडिया इंडेक्स २०१५' या एक्सक्ल्युझिव्ह सर्वेमध्ये भारतातील ७ डेडली साइन्स शोधण्यात आले आहेत. त्यानुसार भारतातून मियाँ खलिफा या पॉर्न स्टारला सर्वाधिक पसंती मिळाली आहे.
मिया खलिफा हिला भारतीयांनी पॉर्न स्टार म्हणून सर्वाधिक पसंती दिली आहे. त्यानंतर प्रिया राय, जुलिया अॅन आणि ब्रँडी लवचा क्रमांक आहे.
सर्वाधिक फ्री व्हिडिओ XVIDEOS आणि PornHub वरून डाऊनलोड करण्यात आले आहे. विशेषतः पॉर्न व्हिडिओ पाहणाऱ्यांमध्ये भारतीय बाजारात गेल्या वर्षाच्या तुलनेत २३ टक्के महिला वाढल्या आहेत.
झी मीडियासाठी उपलब्ध Exclusive सर्वे...
'गुंज लॅब'ने १ जानेवारी २०१५ ते २५ डिसेंबर २०१५ या कालावधीत सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरील माहिती गोळा केली आणि त्यानुसार हा एक्सक्ल्युझिव्ह सर्वे तयार केला आहे.
हा सर्वे झी मीडियाच्या डिजिटल टीमसाठी Exclusive उपलब्ध करून देण्यात आला आहे.
'गुंज लॅब' यासाठी भारतातील ६०० लोकप्रिय फेसबूक पेजेसचा अभ्यास केला. त्यात सुमारे ०.६ अब्ज लोक भेट देतात. अधिकृत ब्रँड आणि सेलिब्रिटीचे यूट्यूब मेन्शन, गुगल सर्च, तसेच ४५० पेक्षा अधिक न्यूज आर्टिकल्स, टोरेंट डाऊनलोड अशा माध्यामातून मोठ्या स्तरावर हा सर्वे करण्यात आला आहे.