भयानक: लढाईत केवळ 20 दिवस पुरेल इतकाच दारुगोळा भारताकडे

पाकिस्तान पुन्हा पलटला, सीमेवर पुन्हा एकदा गोळीबार सुरू झाला आहे.  अशातच सगऴ्यात धक्कादायक आणि चिंता व्यक्त करणारी बातमी म्हणजे जर युध्दाची  परिस्थिती निर्माण झाल्यास भारतीय सैन्याकडे फक्त २० दिवस पुरेल इतकाच दारू गोळा शिल्लक आहे.

Updated: Aug 26, 2014, 08:29 PM IST
भयानक:  लढाईत केवळ 20 दिवस पुरेल इतकाच दारुगोळा भारताकडे title=

नवी दिल्ली : पाकिस्तान पुन्हा पलटला, सीमेवर पुन्हा एकदा गोळीबार सुरू झाला आहे.  अशातच सगऴ्यात धक्कादायक आणि चिंता व्यक्त करणारी बातमी म्हणजे जर युध्दाची  परिस्थिती निर्माण झाल्यास भारतीय सैन्याकडे फक्त २० दिवस पुरेल इतकाच दारू गोळा शिल्लक आहे.

एका इंग्रजी दैनिकाने काढलेल्या माहितीनुसार मार्चमधील आकडेवारीनुसार भारताकडे युद्धाच्या परिस्थितीमध्ये २० दिवस पुरेल इतकाच दारू गोळा शिल्लक आहे. ६ महिन्यानंतर सुद्धा परिस्थिती तशीच आहे. यामध्ये काहीच बदल झालेल्या नाही. या नाजूक परिस्थितीवर सरकार योग्य अशी पावले उचलणार आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
ही परिस्थिती जास्त काऴ वापरण्यात न आलेले शस्त्र आणि शस्त्रनिर्माती कंपनीचे मंद गतीने होत असलेले उत्पादन यामुऴे निर्माण झाली आहे. आपल्या देशाकडे ३० दिवस जोरदार लढाई करणारा आणि   ३० दिवस सामान्य लढाई करण्यारा दारू गोऴा पाहिजे तसेच वॉर वेस्टेज रिजर्व (wwr) हे ३ दिवस सामान्य लढाई आणि १ दिवसाची गंभीर लढाई बरोबर मानली जाते. अशा वेऴेस युद्धात वेस्टेज रिजर्व एकूण ४० दिवसापर्यंत गंभीर लढाईसाठी हा साठा आवश्यक आहे. सध्या परिस्थिती अशी आहे जर युद्ध झालं तर भारताकडे दारू गोऴा, हातबॅाम्ब, मिसाईल, अँटी टँक, एअर डिफेन्स, टँक,स्पेशलाइज्ड मशीन, गन मैगनीज,माइन फ्यूज, यासारखा शस्त्रसाठा युद्धात शूत्रांना भीती दाखविण्यासाठी आवश्यक असतो आणि हाच शस्त्रसाठा भारताकडे कमी आहे. जर संपूर्णपणे युद्ध पुकारल गेलं तर यामधले काही गोष्टी आठवड्याभरात संपूण जातील. 
आर्मीच्या एम्युनिशन रोडमॅपनुसार 2019 पर्यत भारताकडे WWR लढाई करण्यासाठीचा साठा शंभर टक्के होणार तसेच यासाठी 97 हजार कोटींचे बजेट आवश्यक आहे. सुत्रांच्या माहितीनुसार 23 प्रकारचा शस्त्रसाठा विदेशातून आयात करावा लागेल तर इतर शस्त्रांची निर्मिती कारख्यानात करावी लागेल.
एम्युनिशनच्या तीन कॅटेगिरी असतात यामध्ये पहिली फर्स्ट लाइन नंतर ऑन वेपन आणि तिसरी यूनिट रिजर्व या तीन स्तरावर बटालीयन ठेवली जाते. दोन नंबरची बटालीयनला ब्रिगेड आणि डिविजन या ठिकाणी ठेवले जाते तर आणि फर्स्ट लाइनला युद्धात लढण्यासाठी  वापर केला जातो.
भारतीय सरकार या चिंताजनक गोष्टीवर बारकाईने लक्ष केंद्रीत करत आहे. पण जगातली दुसरी मोठे सैन्य दल असलेल्या भारताकडे दारू गोऴा कमी पडणे ही चिंताजनक बाब आहे. 1999 मध्ये भारताला दारू गोऴा कमी पडला होता त्यावेऴेस इजराइलकडून दारु गोऴा खरेदी करावा लागला होता. या इतिहासातून भारताने काहीतरी शिकलं पाहीजे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.