साईंचं देवपण नाकारत, साईभक्तांना पळवलं

छत्तीसगडमधील कवर्धामध्ये सुरू असलेल्या धर्म संसदेत मंचावर असलेल्या संतांनी जोर-जोरात ओरण्यास सुरूवात केली, आणि रागात दोन साई भक्तांना मंचावरून खाली उतरवलं. हे साईभक्त आपली बाजू मांडण्यासाठी मंचावर चढले होते.

Updated: Aug 25, 2014, 06:58 PM IST
साईंचं देवपण नाकारत, साईभक्तांना पळवलं title=

कवर्धा : छत्तीसगडमधील कवर्धामध्ये सुरू असलेल्या धर्म संसदेत मंचावर असलेल्या संतांनी जोर-जोरात ओरण्यास सुरूवात केली, आणि रागात दोन साई भक्तांना मंचावरून खाली उतरवलं. हे साईभक्त आपली बाजू मांडण्यासाठी मंचावर चढले होते.

पांढऱ्या कपड्यात असलेल्या एका साईभक्ताने हातात माईक घेतला आणि सांगितलं की शंकराचार्यांच्या विरोधात आपण उपोषण करू. यावरून शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांचे समर्थक चिडले. यातील एका संताने माईक हिसकावला आणि सांगितलं हे लोक हिंदू धर्माला आव्हान देतायत.

यानंतर दोन्ही साईभक्तांना येथून बाहेर काढण्यात आलं, त्यांना त्यांची बाजू मांडण्यास वेळ देण्यात आला नाही. द्वारका पीठाचे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी काही वेळापूर्वीच सांगितलं होतं की, हिंदुंना साईंची पूजा करू नये. कारण त्यांनी हिंदू धर्माचं नुकसान केलं आहे. या वक्तव्यावरून मोठा वाद झाला होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.