UPDATE: राष्ट्रपती भवनात खास मेजवानी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचं नवी दिल्लीत आगमन झाल्यानंतर, पाकिस्तानी सैन्याने सीमेपलीकडून गोळीबाराला सुरूवात केली आहे.

Updated: Jan 25, 2015, 09:53 PM IST
UPDATE: राष्ट्रपती भवनात खास मेजवानी   title=

राष्ट्रपती भवनात खास मेजवानी  

राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी ओबामांच्यां सन्मानार्थ आयोजित केलेल्या मेजवानीकरता बराक ओबामा रवाना झाले आहेत

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, जेष्ठ अभीनेते अमिताभ बच्चन आणि नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांच्यासह इतर महत्वाच्या व्यक्तींना राष्ट्रपती भवनावर मेजवानीचे आमंत्रण.

अणुकरारातील दोन महत्त्वाच्या मुद्यांवर सहमती : ओबामा  

संध्याकाळी ४.४५ वाजता - पत्रकार परिषद...

मोदींनी मानले ओबामांचे आभार...

  • भारत आणि अमेरिकेचे नैसर्गिक नाते असून ते पुढे नेण्याची गरज - मोदी
  • दोन्ही देशांमध्ये आता व्यापारी संबंधही निर्माण होत असून संरक्षण, उत्पादन या क्षेत्रात दोन्ही देश एकमेकांना सहकार्य करतील - मोदी
  • नागरी अणू करार हा दोन्ही देशांमधील चर्चेचा केंद्रबिंदू - मोदी
  • प्रत्येक देशाने दहशतावादीचे चांगला व वाईट दहशतवाद असा भेदभाव न करता त्याचे समूळ उच्चाटन केले पाहिजे - ओबामांसमोर मोदींनी पाकला सुनावले
  • अमेरिका - भारताचे संबंध दृढ होतील, दोन्ही देशांचे मैत्रीपूर्ण संबंध जगाच्या हिताचे - मोदी

ओबामांचं उत्तर -

  • नमस्ते असे सांगत बराक ओबामा यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात केली.
  • मेरा प्यार भरा नमस्कार म्हणून ओबांनी मानले भारतीयांचे आभार
  • मॅडिसन स्क्वेअर येथील मोदींच्या भाषणातून दोन्ही देशांमधील जनतेमध्येही मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे दिसून आले - ओबामा
  • दोन्ही देशांमधील व्यापारात 60 टक्क्यांनी वाढ झाली आहे, भारत-अमेरिकेचे संबंध नव्या उंचीवर नेण्याचा आमचा प्रयत्न आहे-ओबामा 
  • अजमेर, अलाहाबाद या शहरांच्या विकासात अमेरिका मदत करणार - ओबामा
  • दोन्ही देशांमधील संबंध नव्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न - ओबामा
  • संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारताला कायमचे सदस्यत्व मिळावे यासाठी आमचा पाठिंबा - अमेरिका
  • 'चाय पे चर्चा'साठी निमंत्रण दिल्याबद्दल मोदींचे आभार - ओबामा
  • अणुकरारातील अतिशय महत्वाच्या अशा दोन मुद्यांवर सहमती - ओबामा 
  • संरक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञान सहकार्य, उर्जा निर्मिती अशा विविध क्षेत्रांमध्ये भारतासोबत काम करणार - ओबामा 
  • रशियाची अर्थव्यवस्था कमकुवत व्हावी आणि त्यांचा विकास होऊ नये असे आम्हाला वाटत नाही - ओबामा
  • ओबामा आणि आमच्यात काय चर्चा झाली हे पडद्याआड राहू द्या - मोदी

बराक ओबामा यांना गुजराथी कढीचा पाहुणचार

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांना गुजराथी कढीचा पाहुणचार देण्यात आला. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते सैय्यद अकबरूद्दीन यांनी ओबामांना देण्यात आलेल्या पाहुणचाराची यादी ट्विटरवर जाहीर केली आहे.

बराक ओबामाला खाण्यात पनीर लबाबदार, केला मेथी नू साग, मटर पुलाव, मिक्सि व्हेजिटेबल, कलौंजी आणि नदरू के गूलर सारखे मेन्यू देण्यात आले.

सर्वात महत्वाचं म्हणजे एकही मांसाहारी मेन्यू , ओबामांच्या सकाळच्या जेवणात नव्हता.

दुपारी ०२.३० वाजता (२५ जानेवारी) : भारत-अमेरिका अणू करारावर शिक्कामोर्तब - सूत्र

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताच्या तीन दिवसाच्या दौऱ्यावर असलेले अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांच्यात हैदराबाद हाऊसमध्ये चर्चा झाली आहे.

दोन्ही देशांमघ्ये अनेक मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे, ओबामांनी पुढाकार घेतल्याने अणुकराराचा मार्ग मोकळा झाला असल्याचंही सांगण्यात येत आहे. भारत-अमेरिका अणू करारावर शिक्कामोर्तब झालं असल्याचंही सांगण्यात येत आहे. 

पुढच्या वर्षी अणू कराराची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे, या अणू करारामुळे भारताला अधिक वीजनिर्मिती करता येणार आहे. अणू करारानुसार भारतीय अणु भट्ट्यांची अमेरिका देखरेख करणार नाहीय.

नरेंद्र मोदी आणि बराक ओबामा थोड्याच वेळात संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत, यात अणू कराराविषयी घोषणा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

दुपारी ०१.३० वाजता (२५ जानेवारी) : पाकिस्तानचा गोळीबार आणि ओबामांचं जयहिंद!

नवी दिल्ली : पाकिस्तानने सीमेवर गोळीबार केल्यानंतर काही क्षणात बराक ओबामा यांनी ट्ववीट करून एक संदेश लिहला आहे, तसेच जयहिंद म्हटलं आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचं आज सकाळी दहा वाजता भारतात आगमन झालं, यानंतर पाकिस्तानकडून भारताच्या सीमेवर गोळीबार करण्यात आला. 

अमेरिकेने बजावल्यानंतरही पाकिस्ताने गोळीबार केला. मात्र यानंतर काही वेळाने बराक ओबामा यांनी ट्वीटरवर ट्वीट केलं. भारत आणि अमेरिका संबंधासाठी ही भेट एक नवं पर्व असल्याचं बराक ओबामा यांनी म्हटलं आहे. 

एवढंच नाही तर शेवटी जय हिंद लिहायलाही बराक ओबामा विसरले नाहीत.

अणूउर्जेवर भारत आणि अमेरिकेत चर्चा होणार असल्याची चिन्हं आहेत, या पार्श्वभूमीवर चीन आणि पाकिस्तानचं बराक ओबामा यांच्या भेटीकडे लक्ष लागून आहे. 

पाकिस्तानने केलेल्या गोळीबारानंतर बराक ओबामा यांनी केलेलं ट्वीवीट आणि जयहिंद हे अमेरिका आणि भारत आणखी जवळ येणार असल्याची नांदी असल्याचं सांगण्यात येत आहे.

सकाळी १२.३० वाजता (२५ जानेवारी) : बराक ओबामांकडून राजघाटवर स्मृतीपुष्प

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी राजघाटवर जाऊन महात्मा गांधी यांना स्मृतीपुष्प वाहून श्रद्धांजली दिली. तसेच राजघाटवर पिंपळाच्या झाडाचं वृक्षारोपण केलं.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात अणूकरारावर चर्चा होणार आहे, या चर्चेकडे पाकिस्तान आणि चीनचं लक्ष लागून आहे.

बराक ओबामा यांना राष्ट्रपती भवनात गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला तेव्हा बराक ओबामा यांनी हा मोठा सन्मान असल्याचं म्हटलं आहे.

सकाळी ११.५० वाजता (२५ जानेवारी) : बराक ओबामा यांना 'गार्ड ऑफ ऑनर' 

नवी दिल्ली : भारताच्या दौऱ्यावर असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना दिल्लीत राष्ट्रपती भवनात 'गार्ड ऑफ ऑनर' देण्यात आला. 

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात बराक ओबामा यांचं स्वागत केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय मंत्रिमंडळातील काही सदस्य हजर होते.

यावेळी बराक ओबामा यांना सन्मानार्थ २१ तोफांची सलामी देण्यात आली, तसेच अमेरिका आणि भारताच्या राष्ट्रगीताची धुन वाजवण्यात आली.

तीन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी बराक ओबामा आज सकाळी १० वाजता भारतात दाखल झाले आहेत.

सकाळी १०.३० वाजता (२५ जानेवारी) : ओबामांचं आगमन आणि पाकचा थयथयाट

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचं नवी दिल्लीत आगमन झाल्यानंतर, पाकिस्तानी सैन्याने सीमेपलीकडून गोळीबाराला सुरूवात केली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारताच्या दौऱ्यावर येतील तेव्हा कुठेही गोळीबार केला, हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर याद राखा, असा इशारा अमेरिकेने दिला होता,.

तरीही देखिल पाकिस्तानने सीमेपलीकडून गोळीबार केला आहे. यावरून आम्ही अमेरिकेला जुमानत नसल्याचं पाकिस्तानला दाखवून द्यायचं असेल, असं सांगण्यात येत आहे.

एकंदरीत बराक ओबामा यांचं भारतात आगमन झाल्यानंतर पाकिस्तानचा थयथयाट झाला आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.