मुंबई : जवळपास ८ वर्षाआधी २००८ मध्ये जागतिक मंदीनंतर भारतात पगारवाढीमध्ये फक्त ०.२ टक्के वाढ झाली. चीनने सर्वाधिक 10.6 टक्के वेतनवाढ केली. भारतात मात्र वेतनवाढ फक्ट 0.2 टक्के होती. पण देशाचं दरडोई उत्पन्न (जीडीपी) हे 63.8 टक्क्यांनी वाढलं.
वेतनवाढीमध्ये चीन, इंडोनेशिया आणि मेक्सिको सर्वात पुढे आहेत. यांचा पगारवाढ अनुक्रमे 10.6, 9.3 आणि 8.9 टक्के होता. तुर्की, अर्जेंटीना, रूस आणि ब्राजील यांची पगारवाढीची स्थिती यंदा मात्र खूपच खराब होती.
रिपोर्टनुसार नव्याने उभरत्या देशांमध्ये जी-20 बाजार हे एकतरफी राहिले आहे. एकतर खूप अधिक पगारवाढी झाली आहे नाहीतर दुसरीकडे एकदम कमी पगारवाढ झाली आहे. भारतमात्र या दोघाच्या मध्ये उभा आहे. रिपोर्टनुसार भारतात वेतनवाढ ही कमी ही नाही झाली आणि वाढली देखील नाही. त्यामुळे भारताची जीडीपी रेट हा २००८ पासून ६३.८ टक्क्यांनी वाढलं असलं तरी पगारवाढचं प्रमाण हे कमी राहिलं आहे.