माल्याचे पंख कापण्यासाठी सीबीआय लंडनमध्ये दाखल

उद्योगपती विजय मल्याला भारतात परत आणण्यासाठी सीबीआय आणि ईडीची टीम मंगळवारी लंडनमध्ये पोहोचलीय.

Updated: May 3, 2017, 11:36 AM IST
माल्याचे पंख कापण्यासाठी सीबीआय लंडनमध्ये दाखल title=

नवी दिल्ली : उद्योगपती विजय मल्याला भारतात परत आणण्यासाठी सीबीआय आणि ईडीची टीम मंगळवारी लंडनमध्ये पोहोचलीय.

सीबीआय आणि अंमलबजावणी संचलनालयची (ईडी) टीम लंडन न्यायालयात सुरु असलेल्या मल्याच्या प्रकरणाशी संबंधीत पुरावे सादर करणार आहे. विजय मल्याला गेल्या महिन्यात 15 एप्रिलला लंडनमद्ये अटक करण्यात आली होती.

वेस्टमिन्स्टर न्यायालयाच्या आदेशानंतर स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी ही अटकेची कारवाई केली होती. मल्ल्याला अटक केल्यानंतर अवघ्या काही तासांतच वेस्टमिन्स्टर न्यायालयाकडून त्याला जामीन मिळाला होता.

विविध बँकांचे नऊ हजार कोटींचे कर्ज थकवून मल्य लंडनमध्ये गेलाय. त्यामुळे मल्याला फरार घोषीत करण्यात आलंय. अनेकदा समन्स बजावून देखील तो भारतात येण्यासाठी टाळाटाळ करतोय. त्यामुळे आता मल्ल्याला भारतात परत आणण्यासाठी ईडी आणि सीबीआयला कितपत यश येतं याकडे सा-यांचं लक्ष लागलंय.