नवी दिल्ली : भारतीय रेल्वे तसेच सार्वजनिक वाहतूक सेवांचे वेळापत्रक आता गुगल मॅपवर दिसणार आहे. गुगलने आज ही घोषणा केली.
गुगलमॅपवर यापुढे भारतातील रेल्वे, बस तसेच मेट्रोचे वेळापत्रकही दिसणार आहे. गुगलमॅपवर "गुगल ट्रान्सीट' या फिचरद्वारे ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे लोकांच्या प्रवासाचा कार्यक्रम लवकर आणि अगदी सहजपणे ठरू शकेल, असेही गुगलने म्हटले आहे.
'बस, रेल्वे, मेट्रो, ट्राम्सद्वारे आपल्या पुढील इच्छित स्थळी जाण्यासाठी योग्य, अचूक नेमकी माहिती मिळविण्यासाठी गुगलमॅपच्या गुगल ट्रान्सीटचा लाखो लोकांना उपयोग होणार आहे' असल्याचं या प्रकल्पाचे व्यवस्थापक सुरेन रूहेला यांनी म्हटलंय.
भारतातील एकूण १२ हजार गाड्यांचं रेल्वे वेळापत्रक त्यावर उपलब्ध असेल. देशातील प्रमुख शहरातील रेल्वेसह अन्य माध्यमातील वाहतूकीचे वेळापत्रक गुगलमॅपवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामध्ये अहमदाबाद, बंगळूर, चेन्नई, हैद्राबाद, कोलकाता, मुंबई, दिल्ली आणि पुण्याचाही समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती गुगलद्वारे कळविण्यात आली आहे.
भारतातील आठ शहरांतील भारतीय रेल्वेच्या प्रवासाचे वेळापत्रकही पाहता येणार आहे. सध्या न्यूयॉर्क, लंडन, टोकियो आणि सिडनीसह जगातील २ हजार ८०० शहरांमधील प्रवासासाठीची उपयुक्त माहिती गुगल मॅपवर उपलब्ध आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.