रेल्वेचं नवं वेळापत्रक आजपासून लागू, 90 गाड्यांच्या स्पीडमध्ये वाढ

रेल्वेचं नवं वेळापत्रक आजपासून देशभरात लागू झालंय. यावेळी मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. तब्बल 90 गाड्यांची स्पीड वाढवण्यात आलीय. म्हणजे 90 गाड्या सुपरफास्ट श्रेणीमध्ये केल्या गेल्यात. तर अनेक जुन्या गाड्यांचीही स्पी़ड वाढलीय. त्यामुळं आपल्या प्रवासाचा वेळ आता 10 मिनीटांपासून 2 तास 35 मिनीटांपर्यंत कमी होणार आहे. 

Updated: Oct 1, 2015, 10:59 AM IST
रेल्वेचं नवं वेळापत्रक आजपासून लागू, 90 गाड्यांच्या स्पीडमध्ये वाढ title=

नवी दिल्ली: रेल्वेचं नवं वेळापत्रक आजपासून देशभरात लागू झालंय. यावेळी मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. तब्बल 90 गाड्यांची स्पीड वाढवण्यात आलीय. म्हणजे 90 गाड्या सुपरफास्ट श्रेणीमध्ये केल्या गेल्यात. तर अनेक जुन्या गाड्यांचीही स्पी़ड वाढलीय. त्यामुळं आपल्या प्रवासाचा वेळ आता 10 मिनीटांपासून 2 तास 35 मिनीटांपर्यंत कमी होणार आहे. 

दिल्ली आणि मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. या दोन्ही महानगरांमध्ये प्रवास करणाऱ्यांचा वेळ आता वाचणार आहे. 

या गाड्यांची स्पीड वाढली -
- मुबंई सेंट्रल- नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस आधी पेक्षा 25 मिनीटं लवकर पोहोचवेल. आता ही गाडी संध्याकाळी 5 वाजता सुटेल.
- नवी दिल्ली- मुंबई सेंट्रल राजधानी एक्सप्रेस आधी पेक्षा 20 मिनीटं आधी पोहोचवले आणि 8 वाजून 15 मिनीटांनी मुंबई सेंट्रलला पोहोचाल.
- मुंबई सेंट्रल अहमदाबाद शताब्दी 25 मिनीटं आधी पोहोचवेल.
- वांद्रे टर्मिनस भावनगर एक्सप्रेस आता अर्धा तास आधी पोहोचवेल.
- 19050 पाटना बांद्रा टर्मिनस एक्सप्रेस 1 तास 45 मिनीटं कमी वेळ लावेल.
- 16335 गांधीधाम-नागरकोइल एक्सप्रेस अब 1 तास 30 मिनीटांआधीच आपल्याला पोहोचवेल.
- तर 9454 पुरी गांधीधाम एक्सप्रेस आता 2 तास 35 मिनीटं कमी वेळेत पोहोचवेल.

हेल्पलाईन नंबर 139वर मिळेल माहिती
आजपासून देशभरात रेल्वेचं नवीन वेळापत्रक लागू झालंय. त्यामुळं गाडीची वेळ आणि प्लॅटफॉर्म नंबर दोन्हीत बदल होण्याची शक्यता आहे. म्हणून प्रवाशांनी नवी वेळ लक्षात घेता, 139 हेल्पलाइन नंबर वरून माहिती घ्यावी.

दूरांतो एक्सप्रेसचे सर्व स्टेशनवर आता 'कमर्शियल स्टॉपेज'
ममता बॅनर्जी यांच्या काळात सुरू झालेली दूरांतो एक्सप्रेस आता सर्व स्टेशन्सवर कमर्शियल स्टॉपेज घेणार आहे. त्यामुळं अनेक जण नाराज होतील. कारण आता या ट्रेननं प्रवास करतांना नेहमी पेक्षा अधिक वेळ लागू शकतो. 

अधिक माहितीसाठी इथं क्लिक करा

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.