पाकिस्ताननं पहिले दहशतवाद संपवावा, शरीफांच्या आरोपावर भारताचं प्रत्युत्तर

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी यूएनच्या बैठकीत उकरलेल्या काश्मीर मुद्द्यावर भारतानं प्रतिक्रिया दिलीय. विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी शरीफ यांच्या वक्तव्यावर ट्विटरवरू प्रतिक्रिया दिली. भारतानं शेजारी देश पाकिस्तानला दहशतवादाचा सर्वात मोठा स्पॉन्सर म्हणत त्यांच्या ताब्यातील काश्मीर भारताला परत करण्यास सांगितलंय.

Updated: Oct 1, 2015, 09:44 AM IST
पाकिस्ताननं पहिले दहशतवाद संपवावा, शरीफांच्या आरोपावर भारताचं प्रत्युत्तर title=

नवी दिल्ली: पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी यूएनच्या बैठकीत उकरलेल्या काश्मीर मुद्द्यावर भारतानं प्रतिक्रिया दिलीय. विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी शरीफ यांच्या वक्तव्यावर ट्विटरवरू प्रतिक्रिया दिली. भारतानं शेजारी देश पाकिस्तानला दहशतवादाचा सर्वात मोठा स्पॉन्सर म्हणत त्यांच्या ताब्यातील काश्मीर भारताला परत करण्यास सांगितलंय.

दहशतवादावर हल्लाबोल

शरीफ यांनी आपल्या भाषणात म्हटलं होतं, 'भारताच्या ताब्यात असलेल्या काश्मीरच्या अनेक पिढ्यांनी आपलं आयुष्य मागितलंय.' यावर स्वरूप म्हणाले, 'पाकिस्तानचे पंतप्रधान परदेशी ताब्याबद्दल बोलत आहेत. ताबा घेणाऱ्यांची ही चूक आहे. आम्ही अधिकृत काश्मीर लगेच रिकामा करण्याची मागणी करतोय.'

काश्मीरमधून सैन्य हटवणं नाही पाकिस्ताननं दहशतवाद संपवावा हा योग्य रस्ता आहे.

स्वत:ला पीडित म्हणतोय पाकिस्तान

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी काश्मीरबाबत पुन्हा जुनंच आलाप गायला आणि यूएनमध्ये स्वत:ला पीडित दर्शवलं. यावरही स्वरूप यांनी उत्तर दिलंय.

पाकिस्तान आपल्याच धोरणांचा बळी

विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप म्हणाले, पाकिस्तान दहशतवादाचा नाही तर आपल्याच धोरणांना बळी पडलाय.

खरं तर पाकिस्तान दहशतवादाचा सर्वात मोठा स्पॉन्सर आहे. पाकिस्तानच्या अस्थिरतेचं कारण त्यांचं दहशतवादी निर्माण करणं होय. शेजाऱ्यांवर आरोप करणं यावरील उपाय नाही.

पाकिस्तानात दहशतवाद्यांना मिळते शरण

पाकिस्तान भले ही स्वत:ला दहशतवादापासून पीडित असल्याचं म्हणत असेल, पण त्यांच्याच धर्तीवर दहशतवादी शरण घेतात. ही बाब कुणापासूनही लपून राहिलेली नाही. यूएन आणि अमेरिकेकडून दहशतवादी संघटना म्हणून ज्यांची नावं जाहीर केली गेलीत. त्या संघटना पाकिस्तानात अॅक्टिव्ह आहेत. अमेरिकेवर झालेल्या 9/11 च्या हल्ल्याचा मास्टर माईंड ओसामा बिन लादेश पाकिस्तानच्याच धर्तीवर मारला गेला. भारतावरील 26/11 हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिज सईद, लष्करचा कमांडर जकीउर रेहमान लक्वी पाकिस्तानात शरण घेऊन बसले आहेत. नुकतेच भारतात जिवंत पकडले गेलेले दहशतवादी स्वत:ला पाकिस्तानीच म्हणवतायेत. यानंतरही पाकिस्तान यूएनमध्ये स्वत:ला पीडित ठरवतो. 

आणखी वाचा - नवाझ शराफींचा पुन्हा काश्मीर राग, म्हणाले यूएनची सर्वात मोठं अपयश

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.