लेह: भारतीय वैज्ञानिकांना हिमालयाच्या वरील भागात एक विशेष बुटी सापडली आहे. वैज्ञानिकांनी दावा केला हे रोप अशी औषधी आहे की जी आपल्या इम्युन सिस्टिमला रेग्युलेट करू शकते. तसेच पर्वतीय भागात आपल्या शरीराने कसा रिस्पॉन्स द्यायला हवा यासाठी मदत करते. तसेच ही बुटी आपल्याला रेडिओअक्टिव्हिटीपासून वाचविते
रामायणातील लक्ष्मणाचे प्राण वाचविणारी संजीवनी बुटीचा उल्लेख करण्यात आला होता. ती संजीवनी बुटी आपल्याला तर मिळाली नाही ना? असा हा शोध आपल्याला विचार करायला भाग पाडतो.
रोडिओला नावाची ही बुटी थंड आणि उंच ठिकाणच्या वातावरणात सापडते. लद्दाखमध्ये स्थानिक लोक याला सोलो नावाने ओळखतात. आतापर्यंत रेडिओलाच्या उपयोगासंदर्भात जास्त माहिती उपलब्ध नाही. स्थानिक लोक याचा वापर भाजी प्रमाणे करतात.
लेह येथील डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ हाय एल्टिट्यूडने या बुटीच्या औषधी गुणांचा शोध करत आहे. सियाचीन सारख्या कठीण परिस्थितीत तैनात असलेल्या सैनिकांसाठी खूप उपयोगी होऊ शकते.
या संदर्भात संस्थेचे निदेशक आर. बी. श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार रोडिओला इम्युमॉड्युलॅटरी (रोग प्रतिकार क्षमता वाढविणे), एडिप्टोजॅनिक (कठीण वातावरणात शरीराला अनुकूल करणे) आणि रेडिओ-प्रोटेक्टिंग क्षमता वाढवते. यातील सेकंडरी मेटाबोटिटेस आणि फोटोअक्टिव्ह कंपाउंड्समुळे हे शक्य होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.