जम्मू-काश्मीर : एका दहशतवाद्याला कंठस्नान; ५ जवान शहीद

पम्पोर येथे सुरू असलेल्या दहशतवाद्यांच्या सर्च ऑपरेशनमध्ये झालेल्या चकमकीत कॅप्टन पवन कुमार यांच्यासह ५ जवान शहीद झाले आहेत. या चकमकीत एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. भारतीय लष्कराने या कारवाईत एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले आहे.

Updated: Feb 21, 2016, 10:11 PM IST
जम्मू-काश्मीर : एका दहशतवाद्याला कंठस्नान; ५ जवान शहीद

श्रीनगर : पम्पोर येथे सुरू असलेल्या दहशतवाद्यांच्या सर्च ऑपरेशनमध्ये झालेल्या चकमकीत कॅप्टन पवन कुमार यांच्यासह ५ जवान शहीद झाले आहेत. या चकमकीत एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. भारतीय लष्कराने या कारवाईत एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले आहे.

सीआरपीएफकडून अजूनही दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. शनिवारी रात्री हे सर्च ऑपरेशन थांबवण्यात आलं होतं पण रविवारी सकाळी पुन्हा दहशदवाद्यांचा शोध घेण्यास भारतीय जवानांनी सुरुवात केली आहे.