www.24taas.com, वृत्तसंस्था, भारत
डॉलरच्या तुलनेत रुपयाने तळ गाठल्याने ऐन सणासुदीच्या दिवसांत सर्वसामान्यांना महागाईचे चटके सहन करावे लागणार आहेत. वाढत्या महागाईमुळे घाऊक तसेच किरकोळ बाजारालही महागाईने उच्चांक गाठला आहे.
भाज्यांसोबतच कांद्याचे दरही वाढलेत मागिल वर्षाच्या तुलनेत यंदा कांद्याच्या भावात ३२३ टक्क्यांची तर पालेभाज्या ८९ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. फायलीन वादळाचाही कांद्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे.
सप्टेंबरमध्ये महागाईचा दर १३.५४ टक्के राहिला. सरकारी आकडेवारीनुसार अन्न दरवाढ १८.४० टक्के आहे.
गेल्या महिन्याचा विचार करताना १८.१८ने वाढलाय. तर एलपीजी गॅस आणि पेट्रोल यांच्याही किंमती वाढल्या. त्यामुळे महागाईत वाढ झालेय. तर अंडी,मटण, मासे, शितपेय, तंबाखू आदी उत्पादनाच्या किंमतीत घट झाल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी वीज दरवाढीत वाढ झाल्याने वीज महागाईत २.०३ टक्क्यांनी वाढ दिसली.
दरम्यान, रिझर्व्ह बॅंक दुसरे तिमाही धोरण २९ ऑक्टोबरला जाहीर करणार आहे. व्याज दराबाबत काही घोषणा करते का, याकडे लक्ष आहे. उद्योग जगताकडून कर्जामध्ये घट करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे बॅंकेकडून ही मागणी मान्य होणार का? जर झाली तर महागाईवर थोडासा दिलासा मिळेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.