www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं एफआयआर दाखल केलाय. उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला आणि हिंदाल्को कंपनीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आलाय. तसंच माजी कोळसा सचिवांवरही एफआयआर दाखल कऱण्यात आलाय...
कोळसा घोटाळ्याबदद्ल माजी कोळसा सचिव पी सी पारीख यांच्यावरही एफआयआर दाखल झालं आहे. यासंदर्भात हैदराबाद, कोलकाता, मुंबई आणि दिल्लीमध्ये सीबीआयचं धडकसत्र सुरू आहे. कोळसा घोटाळ्याबद्दल दाखल झालेलं हे १४ वं एफआयआर आहे. सीबीआयने नाल्को आणि हिंडाल्को विरोधातही एफआयआर दाखल केलं गेलं आहे.
२००५ साली झालेल्या कोळसा घोटाळ्यासंदर्भात ओडिशातील ब्लॉक्सबद्दल आदित्य बिर्ला समूह आणि आणि या समुहातील कंपनी हिंडाल्को यांचे प्रतिनिधी असल्याबद्दल कुमार मंगलम बिर्ला यांच्या विरोधात एफआयआर दाखल केलं आहे
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.