जवान गुरुनाम सिंग यांची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात जखमी झालेले सीमा सुरक्षा दलाचे जवान गुरुनाम सिंह शहीद झालेत. जम्मू - काश्मीरमधील कथुआ जिल्ह्यामध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. त्यावेळी बीएसएफच्या भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिलं.

Updated: Oct 23, 2016, 10:46 AM IST
जवान गुरुनाम सिंग यांची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी title=

श्रीनगर : पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात जखमी झालेले सीमा सुरक्षा दलाचे जवान गुरुनाम सिंह शहीद झालेत. जम्मू - काश्मीरमधील कथुआ जिल्ह्यामध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. त्यावेळी बीएसएफच्या भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिलं.

सात पाकिस्तानी रेंजर्स आणि एक दहशतवाद्याचा खात्मा करण्यात बीएसएफच्या जवानांना यश आलं. मात्र पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे जवान गुरुनाम सिंग गंभीर जखमी झाले होते. जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी सरकारी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं. मात्र मृत्यूशी सुरु असलेली गुरुनाम सिंग यांची झुंज अपयशी ठरली. गुरुनाम सिंग यांच्या हौतात्म्याचा अभिमान असल्याचे त्यांचे वडील कुलबीर सिंग यांनी म्हटलंय.