नवी दिल्ली : गुजरात पोलिसांच्या कथित एन्काऊंटरमध्ये मारली गेलेली इशरत जहां ही लष्कर ए तोयबाची आत्मघातकी दहशतवादी हल्लेखोर होती. इशरत हिला लष्करच्या मुजामिल यानं आपल्या ग्रुपमध्ये सामील केलं होतं.
असा दावा मुंबई दहशतवादी हल्याचा मास्टरमाईंड डेव्हिड हेडली यानं एनआयए आणि विधी विभागाच्या टीमला शिकागोमध्ये ही माहिती दिलीय. हेडलीच्या या खुलाशानंतर गुजरात पोलीस आणि केंद्राच्या भूमिकेला पृष्टी मिळालीय. इशरत जहाँ एन्काऊंटर प्रकरण हे दीर्घकाळ वादग्रस्त ठरलंय.
गुजरात पोलिसांच्या म्हणण्यानुसार अहमदाबादमध्ये मारल्या गेलेल्या दहशवादी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्यासाठी गुजरातमध्ये दाखल झाले होते. इशरत 15 जून 2004 रोजी जावेद शेख ऊर्फ प्रणेश पिल्लई आणि पाक तरुण अमजद अली आणि जीशान जोहर अब्दुल गनी यांच्यासोबत एन्काऊंटरमध्ये मारली गेली होती.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.