एका दमात 104 उपग्रह... 'इस्रो' नोंदवणार विश्वविक्रम

15 फेब्रुवारीला भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच 'इस्रो' एका दमात (प्रक्षेपणात) 104 उपग्रह सोडण्याचा जागतिक विक्रम नोंदवण्यासाठी सज्ज झालीय.

Updated: Feb 14, 2017, 10:58 PM IST
एका दमात 104 उपग्रह... 'इस्रो' नोंदवणार विश्वविक्रम title=

मुंबई : 15 फेब्रुवारीला भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच 'इस्रो' एका दमात (प्रक्षेपणात) 104 उपग्रह सोडण्याचा जागतिक विक्रम नोंदवण्यासाठी सज्ज झालीय.

बुधवारी सकाळी 9.28 मिनिटांनी श्रीहरिकोटा हुन इस्रोचे अत्यंत भरवशाचे प्रक्षेपक PSLV च्या PSLV C 37 द्वारे ही मोहीम पार केली जाणार आहे. या प्रक्षेपणात पृथ्वीची अत्यंत उत्कृष्ट छायाचित्रे काढणारा 714 किलो वजनाचा Cartosat 2 उपग्रह पाठवला जाणार आहे.

सुमारे 4.7 किलो वजनाचे अमेरिकेतील खाजगी कंपनीचे एकूण 96 उपग्रह (नॅनो सॅटेलाईट्स) तर इस्त्राईल, कझाकिस्तान, युएई, नेदरलॅन्ड, स्वित्झर्लन्ड देशांचे एक ते 4 किलो वजनाचे उपग्रह सोडले जाणार आहेत. या सर्व परदेशातील nano satellites-1 चे एकूण वजन हे 644 किलो असणार आहे.

तर भारताचे सुमारे 10 किलो वजनाचे INS 1A आणि INS 1B हे दोन उपग्रह सोडले जाणार आहे. मोहीम यशस्वी झाली तर PSLV प्रक्षेपकाची सलग 36 वी यशस्वी व्यावसायिक मोहीम असणार आहे.

अशा एकूण 104 उपग्रहांचे वजन 1378 किलो असणार आहे. रशियाने 2014 च्या जुलै महिन्यात एकाच वेळी 37 उपग्रह प्रक्षेपित करण्याचा विश्व विक्रम केला होता.