www/24taas.com, झी मीडिया श्रीहरिकोटा
भारताच्या जीसॅट-14 उपग्रहाचं आज श्रीहरिकोटावरून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. श्रीहरिकोटाच्या सतीश धवन स्पेस सेंटरवरुन हा उपग्रह आकाशात झेपावला. जीसॅट-14 जीएसएलव्ही इन्सॅट डी-5 प्रक्षेपक 1980 किलो वजनाचा आहे. सायंकाळी ४ वाजून १८ मिनिटांनी हे उड्डाण करण्यात आलं.
जीएसएलव्ही डी-५ च्या उड्डाणाचा हा पहिला प्रयत्न नाही, यापूर्वी पहिला प्रयत्न १९ ऑगस्ट रोजी झाला होता. मात्र दुसऱ्या टप्प्याच्या इंधन गळतीमुळे उड्डाण पुढे ढकलण्यात आलं होतं, त्यानंतर आज जीसॅट- 14 चं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं आहे. प्रक्षेपकात अजून तरी कोणतीही बाधा आलेली नाही, यात स्वदेशी बनावटीचं क्रायोजनिक इंजीन वापरण्यात आलं आहे, हे या प्रक्षेपकाचं वैशिष्ट्य मानता येईल.
प्रक्षेपण करतांना क्रायोजनिक इंजीनचा वापर पहिला, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात करण्यात येतो.इस्त्रोकडून जीएसएलव्ही डी-५ या प्रक्षेपकाच्या उड्डाणाचं काऊंटडाऊन श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश संशोधन केंद्रावरून शनिवारी सकाळी ११.१८ पासून करण्यात आली.
त्यानंतर आज 4 वाजून 18 मिनिटांनी जीसॅट-14 अवकाशात सोडण्यात आला. पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी जीसॅटच्या यशस्वी प्रक्षेपणासाठी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केलं हे विज्ञान क्षेत्रातील भारताचं पुढचं पाऊल असल्याची माहिती मनमोहनसिंहांनी सोशल मीडियावरून दिली आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.