इस्रोच्या जीसॅट18 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने विकसित केलेला दळणवळण उपग्रह जीसॅट18चे गुरुवीरी यशस्वी प्रक्षेपण झाले.

Updated: Oct 6, 2016, 08:19 AM IST
इस्रोच्या जीसॅट18 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण title=

बंगळूरु : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने विकसित केलेला दळणवळण उपग्रह जीसॅट18चे गुरुवीरी यशस्वी प्रक्षेपण झाले.

फ्रेंच गुयाना येथील एरियन स्पेसच्या तळावरुन या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. बुधवारीच या उपग्रहाचे प्रक्षेपण केले जाणार होते. मात्र खराब हवामानामुळे हे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले.

मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास हा उपग्रह अवकाशात झेपावला. उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर मोदींनीही ट्विटरवरुन इस्रोचे कौतुक केले.