चेन्नई : तुमच्या प्रार्थनांमुळेच मी पुर्नजन्म घेतला आहे असं भावनिक निवेदन तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी केलं आहे. तब्येतीमध्ये हळूहळू सुधारणा होत आहे. लवकरच कामावर रुजू होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
याबरोबरच AIADMK ला 19 नोव्हेंबरला भरभरुन मतदान करण्याचं आवाहनही जयललिता यांनी केलं आहे. 22 सप्टेंबरपासून त्या चेन्नईतल्या अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत.