जम्मूत पोलीस स्टेशनवर दहशतवादी हल्ला, ७ जवान शहीद

जम्मूत दहशतवाद्यांनी पुन्हा हल्ला केलाय. इथल्या कटुआ परिसरात दहशतवाद्यांनी हिरानगर पोलीस स्टेशनवर हल्ला केलाय. या हल्ल्यात ७ जवान शहीद झालेत तर तीन जण जखमी झालेत.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Sep 26, 2013, 12:06 PM IST

www.24taas.com , झी मीडिया, श्रीनगर
जम्मूत दहशतवाद्यांनी पुन्हा हल्ला केलाय. इथल्या कटुआ परिसरात दहशतवाद्यांनी हिरानगर पोलीस स्टेशनवर हल्ला केलाय. या हल्ल्यात ७ जवान शहीद झालेत तर तीन जण जखमी झालेत.
सैन्याच्या वेषात आलेल्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केलाय. हल्ल्यानंतर दहशतवादी फरार झालेत. तर या दहशतवाद्यांना जेरबंद करण्यासाठी जम्मू आणि सांबा परिसरात नाकाबंदी करण्यात आलीय.
दुसरा हल्ला सांबा मध्ये सैन्यावर झालाय. इथं दहशतवादी आणि पोलिसांमध्ये गोळीबार सुरू आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.