close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

जानेवारी २०१६ मध्ये जिवंत होणार रामायणातील जटायू!

जर तुम्ही रामायण ही मालिका पाहिली असेल तर त्यातील जटायू तुम्हाला नक्कीच आठवत असेल. सीता मातेच्या रक्षणासाठी जटायूने आपल्या प्राणांची पर्वा न करता रावणाशी दोन हात केले होते. यात त्याला मरण आले होते. 

Updated: Dec 17, 2015, 04:00 PM IST
जानेवारी २०१६ मध्ये जिवंत होणार रामायणातील जटायू!

नवी दिल्ली : जर तुम्ही रामायण ही मालिका पाहिली असेल तर त्यातील जटायू तुम्हाला नक्कीच आठवत असेल. सीता मातेच्या रक्षणासाठी जटायूने आपल्या प्राणांची पर्वा न करता रावणाशी दोन हात केले होते. यात त्याला मरण आले होते. 

केरळच्या कोल्लम येथे लवककच जटायू नेचर पार्क जानेवारीमध्ये सुरु करण्यात येणार आहे. या नेचर पार्कमुळे केरळच्या टूरिझम मॅपमध्ये आणखी एक नव्या डेस्टिनेशनची भर पडेल. कोल्लम जिल्ह्याच्या चदयामंगलम गावांत जटायू नेचर पार्क बनवण्यात आलेय. जानेवारी २०१६मध्ये हे सर्वांसाठी खुले करण्यात येईल. 

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार, या पार्कमध्ये जटायूचे मोठे शिल्प बनवण्यात आलेय. ज्या ठिकाणी सीता अपहरणाच्या वेळेस जटायू आणि रावण यांच्यात लढाई झाली त्या ठिकाणी हे शिल्प बनवण्यात आलेय. जगातील सर्वात मोठे शिल्प असल्याचे बोलले जात आहे. २०० फूट लांब, १५० फूट रुंद आणि ७० फूट उंच असे हे शिल्प आहे. हे बनवण्यासाठी तब्बल सात वर्षे लागली. या नेचरपार्कसाठी केरळ सरकारने तब्बल १०० कोटी रुपये खर्च केलेत. जानेवारी २०१६ मध्ये या पार्कात जटायूराजचे दर्शन घेऊ शकता. 

पौराणिक कथांनुसार, जटायू अरुण देवताचे पुत्र होते. त्यांच्या भावाचे नाव सम्पाती होते. रामायणामध्ये जटायूचा प्रामुख्याने उल्लेख कऱण्यात आलाय. जेव्हा लंकेचा राजा रावण सीताचे अपहरण करुन आकाशमार्गे पुष्पक विमानातून जात होता तेव्हा जटायूने रावणाशी युद्ध केले. या युद्धात रावणाने जटायूचे पंख कापले. यामुळे जटायू जखमी होऊन जमिनीवर कोसळला. राम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधात निघालेले असताना त्यांना जटायू मरणासन्न अवस्थेत पाहिला. त्यानेच रावणाने सीतेला लंकेला पळवून नेल्याची माहिती दिली. त्यानंतर त्याने आपले प्राण सोडले.