जयललिता यांची प्रकृती स्थिर

 प्रकृती खालावल्यानं तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस जयललिता यांना चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 

Updated: Sep 25, 2016, 10:02 AM IST
जयललिता यांची प्रकृती स्थिर

चेन्नई :  प्रकृती खालावल्यानं तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस जयललिता यांना चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 

जयललितांना रुग्णालयात दाखल केल्याचं कळताच अण्णा द्रमुकचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं रुग्णालयाच्या आवारात गर्दी केली.. तर नागरिक अम्माच्या चांगल्या आरोग्यासाठी रस्त्यावर प्रार्थना करत आहेत. 

सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचं कारण नसल्याचं रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्बीह विश्वनाथन यांनी सांगितलं. दरम्या यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रुग्णालयाच्या आवारात पोलिसांनी कडक सुरक्षा तैनात केलीये.