जयंती नटराजन काँग्रेसमधून पडणार बाहेर?

ज्येष्ठ काँग्रेस नेत्या जयंती नटराजन आज पक्षाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी काही कंपन्यांसाठी पर्यावरण धोरणं वाकवण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांच्या एका पत्रातून उघड झालंय.

Updated: Jan 30, 2015, 12:16 PM IST
जयंती नटराजन काँग्रेसमधून पडणार बाहेर? title=

नवी दिल्ली : ज्येष्ठ काँग्रेस नेत्या जयंती नटराजन आज पक्षाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी काही कंपन्यांसाठी पर्यावरण धोरणं वाकवण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांच्या एका पत्रातून उघड झालंय.

नटराजन यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींना पाठवलेलं हे पत्र एका इंग्रजी दैनिकानं छापलंय. आपण वाकण्यास नकार दिल्यामुळे पक्षातूनच आपली पद्धतशीर बदनामी केल्याचा आरोपही त्यांनी या पत्रात केला होता. लोकसभा निवडणुकीला १०० दिवस बाकी असताना घेतलेल्या मंत्रीपदाच्या राजीनाम्यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. हे पत्र फुटल्यानंतर आता त्या काँग्रेसचा सोडचिठ्ठी देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारमधून मागील वर्षी केंद्रीय मंत्रिपद काढून घेण्यात आल्यानंतरचा काळ अत्यंत वेदनादायी व सार्वजनिक जीवनात अवमानकारक असा होता, असे जयंती नटराजन यांनी म्हटले आहे.

२०१४मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर तीन महिने आधी नटराजन यांना केंद्रीय पर्यावरणमंत्री पदावरून हटविण्यात आले होते. त्यानंतर दुर्लक्षित करण्यात आल्यामुळे नटराजन या नाराज असल्याचे वृत्त आहे. आपल्याला मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास का सांगितले, तसेच पक्षाच्या प्रवक्तेपदावरूनही का हटविण्यात आले असा जाब नटराजन यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात विचारला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.