कोझिकोड : फेसबूकवर पोस्ट करणाऱ्या महिला पत्रकाराला ऑनलाइन धमकी देण्यात आली आहे. केरळमध्ये मदरशांमध्ये युवक आणि युवतींचे लैंगिक शोषण होत असल्याचा गौप्यस्फोट मुस्लिम महिला पत्रकाराने फेसबूकवर केला होता.
व्ही. पी. राजिना असे महिला पत्रकाराचे नाव आहे. केरळमधील मलयालम या वृत्तपत्रामध्ये उपसंपादकाचे काम करत आहेत. मदरशांमधील विविध अनुभव त्यांनी फेसबूकवर शेअर केले आहेत. फेसबूकवर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदविल्यात. मात्र, यानंतर त्यांचे फेसबूक खाते बंद झाले आहे.
राजिना यांनी आपले अनुभव शेअर करताना म्हटले, मदरशांमध्ये शिक्षक मुलांचे लैंगिक शोषण करतात. एका शिक्षकाने वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना कपडे उतरविण्यास सांगितले होते. त्यानंतर शिक्षकाने विद्यार्थ्यांना नको तिथे हात लावत अश्लील चाळे केले. रात्र शाळेदरम्यान अनेकदा वीज गायब होत होती. अंधारामध्ये ६० वर्षांचे शिक्षक विद्यार्थीनींजवळ येऊन अश्लील चाळे करत होते.
दरम्यान, राजिना यांनी फेसबूक केलेल्या गौप्यस्फोटानंतर त्यांना अनेक गोष्टींच्या विरोधकांना सामोरे जावे लागत आहे. काहींनी त्यांना धमकीही दिली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.