www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
आता बॅंकेत बचत खाते उघडण्यासाठी एकच पुरावा दाखला पुरेसा आहे. त्यामुळे पासबुक काढणे सोपे झाले आहे. याबाबत भारतीय रिझर्व्ह बॅंकेने तसे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
जर तुमचा पत्ता बदला असेल तर तुम्ही सहा महिण्याच्या आत पत्ताच्या पुरावा दिल्यानंतर तो बदलण्यात येणार आहे. तशी माहिती बॅंकेला देणे आवश्यक आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंकेने आपल्या नियमात थोडी शिथिलता आणली आहे.
एकदी व्यक्ती स्थानिक नाही. मात्र, त्याला बॅंकेत खाते खोलायचे असेल तर त्या व्यक्तीचे ज्या ठिकाणी राहतो तेथील शपथ पत्र बंधणकारक असणार आहे. त्यामुळे त्या पत्त्यावर पत्र, चेकबुक, एटीएम कार्ड पावती पाठविणे शक्य होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.