www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार इन्कम टॅक्सची मर्यादा वाढविण्याचे संकेत दिले आहे. त्यामुळे तुमचा बचतीवरील टॅक्स वाचण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी फायन्सशिअल मार्केट रेग्युलेटर्सचे म्हणणे ऐकले तर ते शक्य होणार आहे.
फायन्सशिअल मार्केट रेग्युलेटर्सने अर्थमंत्री जेटली यांना काही सूचना केल्या आहेत. वैयक्तिक आणि संयुक्त कुटुंब यांच्यासाठी इन्कम टॅक्स कलम 80 सी नुसार एक लाख रुपये बचतीची मर्यादा वाढविण्याची आवश्यकता आहे. या कलमानुसार एक लाख रुपयांपेक्षा जास्त बचत करणाऱ्यांना टॅक्समध्ये सूट मिळत नाही. मात्र, ही मर्यादा वाढविली तर यात सूट मिळू शकते.
भारतीय रिझर्व्ह बॅंक आणि रेग्युलेटर्स यांच्या म्हणण्यानुसार बचत वाढविण्यासाठी मर्यादेत वाढ करण्याची आवश्यकता आहे. वाढती महागाई, व्यापारात होणारा कमी नफा आणि रियल इस्टेट तसेच सोने दरात होणारी घसरण यामुळे बचत कमी होत आहे. गेल्या नऊ वर्षात सर्वात कमी बचत झाली आहे.
देशात 2008 मध्ये बचतीचा जेडीपी दर 38 टक्के होता. 2012-2013 मध्ये यामध्ये घट झालेली दिसून येत आहे. जेडीपीचा दर हा 30.1 टक्के झाला. त्यामुळे बचत वाढविण्यासाठी 80 सी कलमानुसार सेविंग कराची मर्यादा वाढविण्याची गरज आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.