माझ्या विजयाने भाजपची उंची वाढली

 जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत ७२ वर्षांचे गुलाब नबी कोहली हे भाजपच्या तिकिटावरून जिंकून आलेले एकमेव मुस्लिम उमेदवार ठरले आहे. 

Updated: Dec 26, 2014, 06:01 PM IST
माझ्या विजयाने भाजपची उंची वाढली title=

जम्मू :  जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत ७२ वर्षांचे गुलाब नबी कोहली हे भाजपच्या तिकिटावरून जिंकून आलेले एकमेव मुस्लिम उमेदवार ठरले आहे. 

कोहली जम्मूमधील कालाकोटे या ५१ टक्के मुस्लीम बहुल विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. कोहली यांनी २००८मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढविली होती, पण त्यावेळी पराभूत झाले होते. त्यावेळी त्यांना ११०० मत मिळाले होते. पण यावेळी त्यांना २५,११७ मत मिळाली आहेत. त्यांनी नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार रोचपाल सिंहला सात हजार मतांनी पराभूत केले आहे. 

कोहली यावेळी म्हणाले, माझ्या विजयाने पक्षाची उंची वाढली आहे. कारण पक्षामुळे मी आमदार बनलो आहे. मोदी फॅक्टर माझ्या विजयात महत्वपूर्ण ठरला असल्याचेही यावेळी कोहली यांनी मान्य केले. 

पक्षाच्या काही गोष्टींशी मी सहमत नाही पण वेळ आल्यावर त्या गोष्टीतील मतभेद दूर होऊ शकतात. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.