www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पेट्रोलियम कंपनी रिलायन्सवर घणाघाती आरोप केले आहेत. दि्ल्लीत मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे आरोप केले.
देशात गॅसचा तुटवडा निर्माण व्हावा, यासाठी रिलायन्सने सर्व काही माहित असूनही मुद्दाम कमी गॅस निर्मिती केली. म्हणूनच गॅसच्या किमती वाढवण्यात आल्या. गॅसचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून गॅसच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत.
रिलायन्सने मंत्र्यांशी संगनमत साधून गॅसच्या किमती वाढवल्या आहेत. याबाबतीन लवकरच अॅण्टी करप्शन गुन्हा दाखल करणार आहे, आणि तशा प्रकारचे आदेश देण्यात आल्याचं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
मुरली देवरा, वीरप्पा माईली आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. मंत्र्यांनी रिलायन्सशी संगनमत साधून नेहमी, गॅसच्या किमती वाढवल्या आहेत.
जोपर्यंत या प्रकरणाची चौकशी होत नाही, तोपर्यंत गॅसच्या किंमती वाढवू नयेत, कारण १ एप्रिल पासून गॅसच्या किंमती वाढवण्याचा प्रयत्न सरकारचा असेल, जर गॅसच्या किमती वाढवल्या तर सीएनजी, खते आणि वीजेचे दरही वाढतील, आणि महागाईचा आगडोंब उसळेल.
गॅसच्या किमती वाढवल्या तर रिलायन्सला ५४ हजार कोटी रूपयांचा फायदा होईल, मात्र तरीही विरोधी पक्ष यावर मूग गिळून का गप्प बसले आहेत, हे समजत नसल्याचं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
गॅसची किंमत प्रति युनिट १ डॉलर कमी व्हायला हव्यात, असंही मुकेश अंबानी यांनी म्हटलं आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.