केजरीवालांच्या निवडणूक लढवण्यावर येणार बंदी?

अरविंद केजरीवाल यांच्यासह आम आदमी पक्षाच्या तीन नेत्यांवर निवडणूक आयोगाची टांगती तलवार आहे. निवडणुकीत अधिक खर्च केल्याची तक्रार दिल्ली निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आली होती. आयोगाच्या तीन सदस्यीय समितीनं आपल्या रिपोर्टमध्ये याबाबत खुलासा केलाय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Mar 6, 2014, 11:04 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
अरविंद केजरीवाल यांच्यासह आम आदमी पक्षाच्या तीन नेत्यांवर निवडणूक आयोगाची टांगती तलवार आहे. निवडणुकीत अधिक खर्च केल्याची तक्रार दिल्ली निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आली होती. आयोगाच्या तीन सदस्यीय समितीनं आपल्या रिपोर्टमध्ये याबाबत खुलासा केलाय.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचे नेते अरविंद केजरीवाल, सोमनाथ भारती आणि सुरिंदर सिंहनं निवडणूक नियमांचा भंग केला. केजरीवाल यांनी निवडणुकीत ४ लाखांहून अधिक म्हणजे २१ लाख रुपये खर्च केले, असं रिपोर्टमध्ये मांडण्यात आलंय.
दिल्ली निवडणूक आयोगानं हा रिपोर्ट मुख्य निवडणूक आयुक्तांकडे सुपुर्द केलाय. आता मुख्य निवडणूक आयुक्त यावर काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. सीमारेषेपेक्षा जास्त खर्च करणाऱ्या दोषी आमदार किंवा खासदारांचं सदस्यत्व रद्द होऊ शकतं किंवा सहा वर्षांपर्यंत त्यांच्या निवडणूक लढवण्यावर बंदी घातली जावू शकते. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे नवी दिल्लीचे आमदार आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.