www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
केंद्रात बहुमतात आलेल्या भाजप सरकारच्या कार्यकाळाच्या सुरूवातीलाच, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना संसद भवनातील कार्यालय सोडावं लागलं आहे.
लालकृष्ण अडवाणी यांना हा रूम सुरूवातीला विरोधपक्ष नेते आणि एनडीएचे कार्यकारी अध्यक्ष या नात्याने मिळाला होता.
लालकृष्ण अडवाणी यांना मागील दहा वर्षापासून संसद भवनात ही खोली मिळाली होती. या खोली बाहेर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि खाली एनडीएचे कार्यकारी अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी यांची नेम प्लेट लावण्यात आली होती.
मात्र लोकसभेत नव्या सरकारची स्थापना झाल्यानंतर एनडीएच्या कार्यकारी अध्यक्षांच्या नावाची प्लेट हटवण्यात आली आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाची नंबर प्लेट अजूनही कायम आहे.
या खोलीचा ताबा परत घेण्यात आलाय. यामुळे अडवाणी मागील दोन दिवसांपासून भाजपच्या कार्यालयात बसून होते.
लालकृष्ण अडवाणी 2009 पासून, विरोधीपक्षाचे नेते आहेत, यानंतर एनडीएचे कार्यकारी अध्यक्षही अडवाणी राहिले आहेत. अडवाणी आता एनडीएचे कार्यकारी अध्यक्ष राहिलेले नाहीत.
एनडीएच्या कार्य़कारी अध्यक्षपदाची निवडणूक अजून राहिलेली आहे. अडवाणींची या अध्यक्षपदी पुन्हा निवड होईल अशी शक्यता व्यक्त होतेय. मात्र अधिकृतपणे अशी कोणतीही घोषणा झालेली नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.