अरवल : बिहारच्या अरवल जिल्ह्यात मधुबन मैदानात मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या निवडणूक प्रचार सभेत आरजेडी सुप्रिमो लालू प्रसाद यादव थोडक्यात बचावले. सभेत व्यासपीठावर प्रमाणापेक्षा जास्त व्यक्ती चढून आल्याने एक भाग तुटला.
लाकडाच्या या व्यासपीठावर प्रमाणापेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित झाल्याने एक भाग तुटला त्यामुळे आरजेडी कार्यकर्ता व्यासपीठावरून खाली पडले. व्यासपीठ तुटल्याने कोणत्या प्रकारचे नुकसान झाले नाही. पण त्याच्या दुसऱ्या बाजूला मंचावर असलेल आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव थोडक्यात बचावले.
व्यासपीठाचा एक भाग कोसळल्यानंतर त्या ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पण त्यानंतर काही जण व्यासपीठावर खाली उतरले आणि लालू प्रसाद यादव यांनी तुटलेल्या मंचावरून सभेत भाषण केले. त्यावेळी आपल्या भाषणात मस्करी करताना म्हटले की, चांगल्या माणसाला काही होत नाही, पण ज्यांनी वाईट केले, त्यांना शिक्षा होईल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.