अभिनेता अजय देवगनच्या रॅलीत जोरदार गोंधळ

बिहारमधील बिहारशरीफमध्ये अभिनेता अजय देवगनच्या रॅलीत जोरदार गोंधळ झाला. अजय देवगन भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी गेला होता. बिहारमध्ये सध्या बिहार विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत. अजय देवगन रॅलीत पोहोचल्यानंतर, गर्दीवरील नियंत्रण सुटलं, त्यामुळे त्याचं वेळेस अजय देवगनला हेलिकॉप्टरने परत पाठवण्यात आलं.

Updated: Oct 14, 2015, 10:04 AM IST
अभिनेता अजय देवगनच्या रॅलीत जोरदार गोंधळ title=

बिहारशरीफ : बिहारमधील बिहारशरीफमध्ये अभिनेता अजय देवगनच्या रॅलीत जोरदार गोंधळ झाला. अजय देवगन भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी गेला होता. बिहारमध्ये सध्या बिहार विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत. अजय देवगन रॅलीत पोहोचल्यानंतर, गर्दीवरील नियंत्रण सुटलं, त्यामुळे त्याचं वेळेस अजय देवगनला हेलिकॉप्टरने परत पाठवण्यात आलं.

यानंतर गर्दीतील लोकांचा आणखी संताप वाढला, यानंतर लोकांनी खुर्च्या फेकायला सुरूवात केली. प्रकरण एवढं वाढलं की, पोलिसांनी लाठीचार्ज करावा लागला, यानंतर लोकांनी केलेल्या दगडफेकीत पोलिस जखमी झाले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.