लालू प्रसाद म्हणजे मुदत संपलेलं औषध

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव अनेकांची खिल्ली उडवतात, पण त्यांची खिल्ली राजकारणात तशी कमीच उडवली जाते.

Updated: Nov 19, 2014, 03:40 PM IST
लालू प्रसाद म्हणजे मुदत संपलेलं औषध title=

लखनौ : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव अनेकांची खिल्ली उडवतात, पण त्यांची खिल्ली राजकारणात तशी कमीच उडवली जाते.

कारण लालूप्रसाद यादव म्हणजे मुदत संपलेले औषध आहे, असे लोक जन शक्ती पक्षाचे अध्यक्ष रामविलास पासवान यांनी म्हटलंय. 

लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना ते ‘एनआरआय‘ असल्याचे म्हटले होते. 

पासवान म्हणाले, ‘लालू म्हणजे मुदत संपलेले औषध झाले आहे, यामुळेच ते जुन्या विषयांवर बोलताना आढळतात. मोदी सरकार चांगले काम करत असून, जनतेला त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. 

सरकारनेही जनतेच्या हिताचे मोठे निर्णय घेतले आहेत. ‘लालूप्रसाद हे आजारी असून, त्यांना आरामाची गरज आहे,‘ असे चिराग पासवान यांनी म्हटलंय

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.