'संघाला पुन्हा हाफ पँटमध्ये पाठवू'

आरएसएसनं आपल्या गणवेशामध्ये बदल केला आहे. संघाच्या पारंपारिक खाकी हाफ पँटची जागा तपकिरी रंगाच्या फूल पँटनं घेतली आहे.

Updated: Mar 13, 2016, 11:46 PM IST
'संघाला पुन्हा हाफ पँटमध्ये पाठवू' title=

पाटणा: आरएसएसनं आपल्या गणवेशामध्ये बदल केला आहे. संघाच्या पारंपारिक खाकी हाफ पँटची जागा तपकिरी रंगाच्या फूल पँटनं घेतली आहे. संघाच्या या गणवेशावर बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडीचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी टोला हाणला आहे. 

त्यांना आता सत्ता मिळाली आहे, त्यामुळे ते अप टू डेट होत आहेत. गणवेश बदलत आहेत. पण आम्ही त्यांना पुन्हा हाफ पँटमध्ये पाठवू. देशातून भाजपला कोणत्याही परिस्थितीमधून हटवू असं लालूप्रसाद यादव म्हणाले आहेत.