गुडगाव : उत्तरप्रदेशात कायदा - सुव्यवस्थेचे कसे तीन -तेरा वाजलेत, हे या घटनेवरून तुमच्या लक्षात येईलच. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या जावयाची कारच चोरट्यांनी बंदूकीचा धाक दाखवत लंपास केलीय.
सिकंदरपूर मेट्रो स्टेशनच्या बाहेर ही घटना घडली. काही अज्ञात लोकांनी बंदूक दाखवून ड्रायव्हरकडून गाडीच्या चाव्या घेतल्या आणि ते गाडी घेऊ फरार झाले.
गुडगाव पोलीस सहाय्याक आयुक्त तसंच सहाय्यक प्रवक्ते हवा सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवसाढवळ्या चार-पाच अज्ञात व्यक्तींनी लालूंच्या जावयाची म्हणजेच विनीत यादव यांची सफेद रंगाची टोयोटा फॉर्चुर कार पळवलीय.
घटना घडली त्यावेळी दिल्लीचे रहिवासी असलेले विनीत मात्र गाडीत नव्हते. यासंबंधी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आलीय.