आसाराम बापूंनी केला ७०० कोटी रुपयांच्या जमिनीवर कब्जा

सध्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असणारे प्रवचनकार संत आसाराम बापू हे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. मात्र यावेळी ते कुठलं वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे नव्हे, तर मध्यप्रदेशात त्यांनी हडपलेल्या ७०० कोटी रुपयांच्या जमीनीमुळे. त्यामुळे आसाराम बापूंविरोधात कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 16, 2013, 07:40 PM IST

www.24taas.com, रतलाम
सध्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असणारे प्रवचनकार संत आसाराम बापू हे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. मात्र यावेळी ते कुठलं वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे नव्हे, तर मध्यप्रदेशात त्यांनी हडपलेल्या ७०० कोटी रुपयांच्या जमीनीमुळे. त्यामुळे आसाराम बापूंविरोधात कारवाई करण्याची मागणी होत आहे.

मध्य प्रदेशमधील रतलाममधील २०० एकर जमीन आसाराम बापू आणि त्यांचा मुलगा नारायण साई यांनी अवैधरीत्या हडप केली आहे. त्याबद्दल एसएफआयओकडून आसाराम बापू, त्यांचा मुलगा आणि त्यांचे सहकारी यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची परवानगी मिळाली आहे.

ही जमीन दिल्ली-पुणे फ्रंट कॉरिडोर मार्गावर आहे. या जमिनीवर आसाराम बापूंनी २००० सालापासून कब्जा केला आहे. भारतीय दंड संहिता आणि कंपनी ऍक्ट १९५६ नुसार त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. यासंदर्भातील अर्ज मंत्रालयात सादर करण्यात आला आहे.
जेव्हीएल या पब्लिक लिमिटेड कंपनीचे २००४ मध्ये ‘मुंबई स्टॉक एक्सचेंज’मधून समाप्त झाले आहेत. या कंपनीने मंत्रालयाकडे अर्ज केला आहे.