8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 'इतकी' होऊ शकते पगारवाढ!

8th pay commission fitment factor: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या 8 व्या वेतन आयोगासंदर्भातील चर्चांना आता वेग आलाय.

Pravin Dabholkar | Updated: Nov 18, 2024, 06:52 PM IST
8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; 'इतकी' होऊ शकते पगारवाढ! title=
आठवा वेतन आयोग

8th pay commission fitment factor: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या 8 व्या वेतन आयोगासंदर्भातील चर्चांना आता वेग आलाय. यातील फिटमेंट फॅक्टर हा पगार आणि पेन्शनच्या संशोधनाचा मुख्य आधार आहे. विशेषकरुन या फिटमेंट फॅक्टरवर जोरदार वाद होऊ लागले आहेत. नॅशनल काऊन्सिल ऑफ जॉइंट कन्सल्टेटिव मशिनरीचे सचिव शिव गोपाल मिश्रा यांनी नुकतेच फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी केली होती. वाढती महागाई पाहता हे पाऊल उचलणे खूप गरजेचे असल्याचे ते म्हणाले. 

काय आहे फिटमेंट फॅक्टर आणि का ते महत्वाचे? 

फिटमेंट फॅक्टर असा गुणांक आहे, ज्या माध्यमातून पगार आणि पेन्शनमध्ये संशोधन केले जाते. सातव्या वेतन आयोगाने 2.57 च्या फिटमेंट फॅक्टरचा सल्ला दिला होता. ज्यामुळे किमान पगार 7 हजारने वाढून 17 हजार 990 झाला होता. आता आठव्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर 2.86 ठेवण्याचा सल्ला दिला होता. ही मागणी मान्य झाली असती तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा किमान पगार 51 हजार 451 पर्यंत होऊ शकतो. 

पगारात कितीने होणार वाढ?

जर आठव्या वेतन आयोगामध्ये 2.86 चे फिटमेंट फॅक्टर लागू झाले तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा सध्याचा किमान पगार 17 हजार 990 ने वाढून 51 हजार 451 इतका होऊ शकतो. वाढती महागाई आणि आयुष्य पाहता ही वाढ महत्वाची असल्याचे म्हटले जात आहे. असे असले तरी अशाही काही अफवा आहेत की, किमान वेतन 34 हजार ते 35 हजार पर्यंत असू शकते. पण शिव गोपाल मिश्रा यांनी हे वृत्त फेटाळून लावले. याला कोणताही अधिकृत दुजोरा देण्यात आला नसल्याचे ते म्हणाले. 

आठवा वेतन आयोग केव्हा? 

केंद्र सरकारकडून आतापर्यंत आठव्या वेतन आयोगासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. 2026 मध्ये यासाठी समिती बनेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्स या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत आहेत. वाढती महागाई आणि आयुष्याचा खर्च पाहता सरकार वेळेत न्याय संगत निर्णय घेईल अशी केंद्रीय कर्मचाऱ्यांना अपेक्षा आहे.