भारतरत्न उस्ताद बिस्मिल्लाह खाँ यांची सनई चोरीला

भारतरत्न उस्ताद बिस्मिल्लाह खाँ यांची शहनाई चोरीला गेली आहे. वाराणसीतल्या बिस्मिल्लाह खाँ यांच्या घरी ही चोरी झालीय. 

Updated: Sep 10, 2014, 04:09 PM IST
भारतरत्न उस्ताद बिस्मिल्लाह खाँ यांची सनई चोरीला title=

वाराणसी: भारतरत्न उस्ताद बिस्मिल्लाह खाँ यांची शहनाई चोरीला गेली आहे. वाराणसीतल्या बिस्मिल्लाह खाँ यांच्या घरी ही चोरी झालीय. 

इथंच खाँ साहेब आयुष्यभर राहिले आणि रियाज केला. त्याच घरातून ही शहनाई चोरीला गेली आहे. ज्या शहनाईमुळं संपूर्ण जगात बिस्मिल्ला खाँ यांना ओळख मिळाली होती. तिच चोरीला गेल्यानं त्यांच्या मुलानं याबाबत खंत व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे यासाठी त्यांनी सीबीआयकडे मदत मागितली आहे. 

खाँ साहेबांची विरासत निट पणे जपली गेली नसल्यानं, नसल्याबद्दल संगीतप्रेमींमध्ये नाराजी आहे. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध सरोद वादक उस्ताद अमजद अली खान यांची सरोद गहाळ झाली होती. ब्रिटीश एअरवेजच्या फ्लाईटनं लंडनहून भारतात परतत असताना त्यांची सरोद हरवली होती. अमजद अली खान यांची सरोद 45 वर्ष जुनी असून तिची किंमत तब्बल सहा कोटी रुपये आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.