गुवाहाटी : विचार करा... तुम्ही तुमच्या बेडरुममध्ये जाताय... आणि समोर तुम्हाला बिबट्या दिसला तर...
आसामची राजधानी गुवाहाटीच्या शांतिपूर भागातील घरात मात्र हे खरोखरच घडलंय... पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर या बिबट्याला प्राणीसंग्रहालयात धाडण्यात आलं.
धर्मेश्वर शर्मा यांच्या घरात सकाळी साडे आठच्या सुमारास बिबट्या घुसला... धर्मेश्वर यांच्या पत्नीनं बेडरुमचा दरवाजा उघडला आणि त्यांना समोरच बिबट्या दिसला... त्यांची बोलतीच बंद झाली. पण, प्रसंगावधान राखून त्यांनी तातडीनं दरवाजा बंद करून घेतला.
यानंतर धर्मेश्वर यांनी तातडीनं प्राणीसंग्रहालयाला फोन करून बोलावून घेतलं. त्यानंतर, पाच तास प्रयत्न केल्यानंतर शेवटी या बिबट्याला पिंजऱ्यात बंद करण्यात यश मिळालं. प्राणीसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बिबट्याच्या शरीरावर काही जखमा आहेत... या अगोदरही त्याला कुणीतरी पकडण्याचा प्रयत्न केला असावा, अशीही शंका त्यांनी व्यक्त केलीय.
उल्लेखमीय म्हणजे, गुवाहाटीमध्ये सात वाइल्ड लाईफ सेंचुरी आहेत. त्यामुळे, इथं बऱ्याचदा प्राणी शहरात घुसतात. जेरबंद केलेला हा बिबट्या यंदाच्या वर्षातला शहरात सापडलेला पहिला बिबट्या आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.