www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिलाय. तसे पत्र अध्यक्ष राजनाथ सिंग यांना दिले. हे पत्र प्रसिद्धी माध्यमांच्या हाती आलेय.
अडवाणी यांनी भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह यांना लिहिलेल्या पत्राचा मजकूर जसाच्या तसा-
प्रिय श्री राजनाथसिंहजी,
मला माझ्या संपूर्ण आयुष्यात जन संघ आणि भारतीय जनता पक्षासाठी काम केल्याचा सदैव अभिमान आणि असीम वैयक्तिक समाधान वाटते.
पक्षाच्या सध्याची कार्यपद्धती तथा पक्ष ज्या दिशेने जात आहे त्याच्याशी जुळवून घेणे मला काही काळापासून कठीण जात आहे. डॉ. मुखर्जी, दीन दयालजी, नानाजी आणि वाजपेयीजी यांनी निर्माण केलेला हाच तो आदर्शवादी पक्ष आहे असे आता मला वाटत नाही. हीच चिंता देशाला आणि देशातील जनतेला पडली आहे. आपले अनेक नेते सध्या केवळ वैयक्तिक ध्येयाच्या मागे आहेत.
म्हणून मी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी, संसदीय मंडळ आणि निवडणूक समिती या तीन प्रमुख पदांचा राजीनामा द्यायचे ठरविले आहे. हे पत्र म्हणजे माझा राजीनामा म्हणून ग्राह्य धरावे.
आपला विनम्र
एल. के. अडवाणी
१०.६.२०१३
३०, पृथ्वीराज रोड, नवी दिल्ली
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.