www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्ली
सीमारेषेवरील परिस्थितीचं गांभीर्य आता संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांच्या लक्षात आलेलं दिसतंय. त्यामुळंच ‘योग्य वाटेल` ती कारवाई करण्यास भारतीय लष्करास आपला पूर्ण पाठिंबा असल्याचं संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांनी आज स्पष्ट केलं. पाकिस्तानबरोबरील सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वचभूमीवर संरक्षणमंत्र्यांचं हे विधान भारतीय लष्करास योग्य तो संदेश देणारं असल्याचं मानलं जात आहे.
आयएनएस विक्रांत संपूर्ण भारतीय बनावटीच्या पहिल्या विमानवाहू युद्धनौकेचं अनावरण केल्यानंतर अँटनी यांनी याविषयीची भूमिका मांडली. गेल्या दोन दिवसांत पाकिस्तानी सैन्यानं तब्बल पाच वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानंतर भारतीय लष्करानंही पाक सैन्याच्या या आगळिकीला जोरदार प्रत्युत्तर देण्यास प्रारंभ केला आहे. अँटनी यांनीही आता भारतीय लष्करास आपला ठाम पाठिंबा दर्शविला आहे.
येत्या नोव्हेंबर महिन्यात पाक सैन्यप्रमुख जनरल अश्फााक कयानी हे सेवानिवृत्त होत आहेत. पाक सैन्यामधील बदलत्या वातावरणाच्या पार्श्वाभूमिवर येत्या काही महिन्यांमध्ये सीमारेषेवरील वातावरण तप्तच राहणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. दरम्यान, पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारतानं जोरदार प्रत्युत्तर द्यावं, अशी मागणी देशातील कानाकोपऱ्याधून व्यक्त होतेय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.