अहमदाबाद : एकिकडे तरुणाई व्हॅलेन्टाईन डेच्या तयारीत जुंपली असताना दुसरीकडे मात्र 'लव्ह जिहाद' फैलावणारा एक मॅसेज सध्या सोशल वेबसाईट आणि व्हॉटसअपच्या माध्यमातून वायरल होताना दिसतोय. गुजरातमध्ये हा प्रकार उघडकीस आलाय.
हा मॅसेज 'स्टुडंट ऑफ मुस्लिम यूथ फोरम'कडून प्रसारित केला जात असल्याचं समोर आलंय. दरम्यान, वडोदरा पोलिसांनी हा मॅसेज जुना असल्याचं सांगत 'अशा प्रकारचे कोणतेही मॅसेज शेअर न करण्याचं' आवाहन केलंय.
या आठवड्यात वायरल झालेल्या या व्हॉटसअप मॅसेजमध्ये गैर-मुस्लिम मुलींशी प्रेम करण्यासाठी वेगवेगळी बक्षीसं जाहीर करण्यात आली होती.
वायरल झालेल्या या मॅसेजमध्ये गैर-मुस्लिम मुली पटवण्यासाठी बक्षीस म्हणून पैसे जाहीर करण्यात आले होते. यामध्ये सर्वात जास्त पैसे म्हणजेच तब्बल ७ लाख रुपये जाहीर करण्यात आले होते ते शिख धर्मातील मुलींसाठी...
त्यानंतर गुजराती ब्राह्मण मुलींसाठी ६ लाख, गुजराती कच्छी मुलींसाठी ३ लाख हिंदू ब्राह्मण मुलीसाठी ५ लाख रुपये, हिंदू क्षत्रिय मुलीसाठी ४.५ लाख रुपये, हिंदू ओबीसी, एससी, एसटीसाठी २ लाख, ख्रिश्चन मुलींसाठी ४ लाख रुपये तर बौद्ध धर्माच्या मुलींसाठी १.५ लाख रुपये बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं.
हा मॅसेज शहरातल्या एसएसजी हॉस्पीटलच्या मेडिको लीगल अधिकारी भावेश नायक यांच्या व्हॉटसअप ग्रुपमध्ये दिसला त्यानंतर तो मीडियासमोर आला. सायबर क्राईम ब्रान्च याच्या चौकशी करतेय.