www.24taas.com, नवी दिल्ली
महागाईचा आगडोंब पुन्हा एकदा उसळणार असल्याची चिन्ह दिसत आहेत पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या किमतीत आज दरवाढ होणार असल्याची दाट शक्यता आहे.
केंद्रीय मंत्रीगटाच्या राजकीय समितीची आज सायंकाळी बैठक होणार आहे. त्यात दरवाढीचा निर्णय होऊ शकतो. परंतु, पेट्रोलियम मंत्रालयाने एकाच बैठकीत निर्णय होण्याची शक्यता कमीच असल्याचे म्हटले आहे.
पेट्रोलियम मंत्रालयाने समितीला पेट्रोलियम पदार्थांच्या किंमतीबाबत पत्र लिहीले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तेल कंपन्यांना डिझेलच्या किमतीत लिटरमागे ४ ते ५ रुपयांनी आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ हवी आहे.